विदर्भ

यवतमाळ : थकीत बिलासाठी संपूर्ण गावाचा वीजपुरवठा तोडला

रणजित गायकवाड
यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : थकीत वीज बिलासाठी संपूर्ण गावाचाच वीज पुरवठा बंद करण्याची वेळ विद्युत कंपनीवर आली. नेर तालुक्यातील वाई पारस या गावात हा प्रकार घडला. प्रत्येकाची वीज कापणे शक्य नसल्याने डीपीवरूनच शनिवारी हा पुरवठा खंडीत करण्यात आला.
वाई पारस या गावाला दारव्हा उपविभागाच्या लोही वितरण केंद्रावरून वीजपुरवठा केला जातो. या गावात १७५ घरे आहेत त्यातील ७० लोकांकडे वीज जोडण्या आहेत. ६५ लोकांकडे वीज बिलाची मोठी रक्कम थकीत झाली. बिलाचा भरणा करण्याच्या सूचना कंपनीने  लोकांना वारंवार दिल्यात. परंतु कोणीही रक्कम न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. अखेर डीपीवरूनच पुरवठा खंडित करावा लागला. विद्युत कंपनीच्या पथकाने ही कारवाई केली.
SCROLL FOR NEXT