विदर्भ

चंद्रपूर : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून लाच घेताना जि.प.च्या वरिष्ठ लिपिकास अटक

Shambhuraj Pachindre

चंद्रपूर : वृत्तसेवा; निवृत्ती पेन्शनचे कागदपत्रे महालेखापाल नागपूर यांच्याकडे पाठविण्याकरिता सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून पाच हजारांची लाच मागणाऱ्या जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. गोपाळ उमाजी पेंटेवार असे वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी ( दि. 13 सप्टेंबर) जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सेवानिवृतत कर्मचारी हे तळोधी (तालुका चिमूर) येथील रहिवासी आहेत. ते कनिष्ठ लिपिक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे निवृत्ती पेन्शनचे प्रकरण जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे होते. मात्र वरिष्ठ लिपिक गोपाळ पेंटेवार यांनी सेवानिवृत्त प्रकरणाचे कागदपत्रे महालेखापाल नागपूर यांचेकडे पाठविण्यासाठी फिर्यादीला 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांना, या प्रकरणात स्वतःच्या कामाकरिता लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत विभागाने या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर संशयित आरोपीला पकडण्याकरीता सापळा लावण्यात आला होता.

लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी, सापळा रचून लाचेची तडजोडीअंती 4 हजार रुपये रक्कम स्वीकारताना पेंटेवार यांना चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या गेट समोर मंगळवारी रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत चंद्रपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांच्या नेतृत्वात कर्मचारी रमेश दुपारे, नरेश ननावरे, पुष्पा कोचाळे, वैभव गाडगे, मेघा मोहूर्ले, अमोल सिडाम, रवी ढेंगळे यांनी संयुक्तीपणे पार पाडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT