चंद्रपुरातील अजयपूर शेतशिवारात आलेल्या मगरीचे रेस्क्यू 
विदर्भ

चंद्रपुरातील अजयपूर शेतशिवारात आलेल्या मगरीचे रेस्क्यू

रणजित गायकवाड

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर पासून जवळ असलेल्या अजयपुर शेत शिवारात आढळून आलेल्या मगरीचे आज शनिवारी (6 नोव्हेंबर 2021) ला रेस्क्यू करून प्राण वाचविण्यात वन विभाग व इकोप्रोच्या चमूंना यश आले आहे. त्यानंतर ताडोबा बफर मधील धरणात मगरीला निसर्गमुक्त करण्यात आले.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील चंद्रपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत वलनी राउंड मधील अजयपुर गावाच्या शेतशिवारात मागील दोन-तीन दिवस पासून मगर आढळून आल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. सध्या शेतात धानाचे पिक असून शेतकरी शेतात काम करीत असताना त्यांना मगर आढळून आले. शेतशिवारातील मध्यंतरी असलेल्या नाल्यात मगरीचे वास्तव्य आढळून आले होते. जवळपास 7-8 फुट लांब असलेली मगर नाल्यात असल्याची माहिती मिळताच वनरक्षक सुधीर बोकडे घटनास्थळी पोहचले त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसकर यांना माहिती दिली. मगरीचे रेस्क्यू करण्यासाठी वनकर्मचारी कर्मचा-यांचे पथक दाखल झाले.

तसेच मगरीचे रेस्क्यू करण्यासाठी माजी मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांना पाचारण करण्यात आले. ते इको-प्रो वन्यजीव संरक्षक दलाच्या सदस्यांसोबत घटनास्थली पोहचले. इको-प्रो टीम व चंद्रपुर बफर चे वनकर्मचारी यांनी आरएफओ स्वाती म्हैसकर यांच्या मार्गदर्शनात सदर रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करून मेरीला जिवदान दिले. सदर मगर ताडोबा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कुंदन पोडशेलवार यांनी पाहणी केली.मगर ठणठणीत असल्याने ताडोबा बफर मधील धरणात निसर्गमुक्त करण्यात आली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मून, स्वाती म्हैसकर, बंडू धोतरे व कर्मचारी उपस्थित होते.

रेस्क्यू टीम मधे चंद्रपुर बफर चे ऎस आर घागरगुंडे, जी डब्लू वरगंटिवार, यू जी गाठले, एमबी नागोसे, एस जी चौरे, जीजे दीवटे, ए बी गेडाम, जेएम माहुलिकर, बीएस टेंभेकर, एस डी पाटिल सहभागी होते, तर इको-प्रो चे बंडू धोतरे सह राजेश व्यास, अमोल उत्तलवार, जयेश बैनलवार, वैभव मडावी, निशांत चहांदे सहभागी होते. या आपरेशन मधे वनमजूर व स्थानिक नागरिकांनी मौलाचे सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT