विदर्भ

Nagpur Yoga Day : यशवंत स्टेडियमवर योगदिन, चिमुकल्याची प्रात्यक्षिके

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज (दि. २१) सकाळी नागपूरच्या यशवंत स्टेडियम आबालवृद्ध योगसाधकांनी फुलले होते. यावेळी पांढरा टी-शर्ट व पांढरी पॅन्ट अशा पोशाखामध्ये सर्वच स्तरातील योग साधक उत्साहात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे राम खांडवे यांची या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती होती.

आज जगभरात नववा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. 'हर घर आंगण योग ' ही टॅगलाईन आयुष मंत्रालयाने निश्चित केली आहे. जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 180 देशात हा कार्यक्रम होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत सहभागी होणार आहेत. मला पण योगसाधनेचा उपयोग झाला. निरोगी आयुष्यासाठी योग साधना आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ संदेश यावेळी दाखविण्यात आला. त्यानंतर विविध योगासने मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कार्यक्रमात महानगरपालिका, आयुष व आरोग्य विभाग, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, एनएसएस, एनसीसी, पोलीस, योग संस्थांशी संबंधित योगसाधक सहभागी झाले होते.

जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आ. प्रवीण दटके, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. मनोज कुमार सूर्यवंशी,नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

SCROLL FOR NEXT