यवतमाळ : शेअर मार्केट प्रकरणात युवकाची १५ लाखांनी फसवणूक Pudhari News Network
यवतमाळ

यवतमाळ : शेअर मार्केट प्रकरणात युवकाची १५ लाखांनी फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ :  शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवून त्याचा परतावा मिळविणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पुसद शहरातील रामनगर येथील युवकानेही अधिक परतावा मिळेल या आशेवर मोठी रक्कम गुंतविली. मात्र, तो ठग बाजाराच्या जाळ्यात अडकला. त्याला अधिक परताव्याचे आमिष देत पैसे उकळण्यात आले.

२०२३ पासून त्याच्याकडून गुंतवणुकीच्या नावाने पैसा काढण्यात आला. प्रत्यक्षात मात्र परतावा मिळालाच नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसात तक्रार दिली. मनीष प्रकाश खके या व्यावसायिकाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. काही स्वरूपात त्याला नफाही मिळत होता. नंतर अधिक नफा मिळविण्यासाठी प्रयत्न करणे धोक्याचे ठरले.

एका ठगबाजाने तो एका विख्यात शेअर खरेदी-विक्री करणाऱ्या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे दर्शवून मनीष खके यांना अधिक नफा कसा मिळविता येईल, याचे आमिष दाखवित त्याच्याकडून १५ लाख ६५ हजार ३६ रुपये उकळले.

नफ्याची रक्कम आभासी स्वरूपात दाखविण्यात आली. जेव्हा खके यांनी यातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पुसद शहर पोलिसांनी अज्ञात ठगबाजांवर कलम ४२० भादंविसह सहकलम ६६ ड आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT