फाईल फोटो 
यवतमाळ

यवतमाळ : मोटार सुरू करताना विजेचा शॉक लागून तरुणीचा मृत्यू

वरझडी परिसरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : घर बांधकामावर पाणी मारण्यासाठी मोटार सुरू करीत असताना विजेचा शॉक लागून तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.१५) सायंकाळी यवतमाळ तालुक्यातील वरझडी येथे घडली. या दुर्दैवी घटनेमुळे वरझडी परिसरात शोककळा पसरली. प्रतीक्षा दत्ता बोंडे (वय २०) असे मृत तरुणीचे नाव आहे.

दत्ता अंबादास बोंडे यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाल्यानंतर बांधकाम सुरू करण्यात आले. नवीन घराचे स्वप्न रंगवीत प्रतीक्षा बांधकामावर पाणी मारत होती. त्याकरिता मोटार सुरू करायची. दरम्यान शनिवारी मोटारची पीन प्लगमध्ये टाकत असताना प्रतीक्षाला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर ती खाली कोसळली. यावेळी तिचे आईवडील बाहेर गेले होते तर भाऊ घरावर उभा होता. प्रतीक्षाला उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर रविवारी वरझडी येथे प्रतीक्षावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT