यवतमाळ : चारचाकी गाडीला पोलिस नावाची पाटी लावून गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या तोतया पोलिसांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३ जानेवारी रोजी रात्री जेरबंद केले.
उमरखेड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मोटार सायकल चोरीच्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अवैध रेती तस्करी करणारा टिप्पर आढळून आला. त्यावर पुसदकडे परतणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाला महागाव तालुक्यातील गौळ फाटा येथे एमएच ३१ एएच २८२१ या क्रमांकाची लाल रंगाची कार इंग्रजीमध्ये पोलिस नावाची पाटी लावलेल्या अवस्थेत आढळल्याने शंका आली होती.
पथकातील कर्मचाऱ्यांनी या गाडीवर बॅटरीचा प्रकाश झोत टाकला असता काही व्यक्ती संशयास्पद अवस्थेत हालचाली करत गाडीमध्ये लपत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी जवळ जावून चौकशी केली असता त्या ठिकाणी असलेल्या व्यक्तींनी अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिल्यानें पथकातील कर्मचाऱ्यांचा संशय बळावला. चौकशी केली असता त्यांनी आपले नावे सय्यद मुसबिर सय्यद जमील (वय २५), शेख खालिद शेख नुर (वय २५), सलीम खान - करीम खान (वय २७) सर्व रा. डोंगरगाव ता. महागाव जि. यवतमाळ असल्याचे सांगितले.