अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालक ठार झाला. File photo
यवतमाळ

यवतमाळ : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालक ठार

नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील जवादे फाट्यासमोरील घटना

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१४) राळेगाव तालुक्यातील नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील किन्ही जवादे फाट्यासमोर घडली. प्रभाकरम मन्नीकम (वय ३० रा. अल्लापुरम, तामिळनाडू) असे मृताचे नाव आहे.

प्रभाकरम व त्याचा सहकारी हे दोघे (टी एन- २९- सी वी ०४८३) क्रमांकाच्या ट्रकने झांशी येथून शेंगदाण्याचे कट्टे भरून हेद्राबादकडे जात होते. यादरम्यान त्याने महामार्गावरील किन्ही जवादे फाट्यासमोर रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून लघुशंकेसाठी जात असताना त्याला भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वडकी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुखदेव भोरकडे, पोलिस कर्मचारी अविनाश चिकराम यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पुढील तपास वडकी पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT