यवतमाळ

Yavatmal Crime News | नवजात बाळाला फेकणाऱ्या माता-पित्यास अटक

या प्रकरणात पोलिसांनी तक्रारीवरून जन्मदात्यांविरोधी पांढरकवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : नवजात बाळाला बेवारस स्थितीत नाल्याच्या काठावर फेकण्यात आल्याची घटना पांढरकवडा शहरातील हनुमान वॉर्ड परिसरात उघडकीस आली. बुधवारी नवजात मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून एका युवकाने तिथे धाव घेतली.

नवजात मुलीला पाहून त्याने याची माहिती पोलिसांना दिली. बाळाला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी केतन गजानन कटकोजवार  यांच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास हाती घेतला. दोन तासात त्या मुलीचे आईवडील शोधून त्यांना ताब्यात घेतले. 

पोलिस पथकाने घटनास्थळ पंचनामा करून अज्ञाताविरोधात कलम ९३ बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल केला. नकोशीला नाल्याच्या काठावर ठेवणारे कोण याचा शोध पोलिसांनी सुरू केला. यासाठी गोपनीय खबरे कामाला लावले, तसेच पारिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. सायबर तज्ज्ञाच्या मदतीने त्या परिसरातील डमडाटा याची पडताळणी केली.

एकाच वेळी सर्व बाजूने तपास करत असताना पोलिसांना संशयिताचा सुगावा लागला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अर्चना सुनिल शिवरकर (२८), सुनिल दिगांबर शिवरकर (३१) रा. नेहरू वार्ड असे अटक करण्यात आलेल्या निर्दयी माता-पित्याचे नाव आहे. मुलगी झाली म्हणून त्यांनी तिला उघड्यावर फेकून दिल्याचे तपासात पुढे आले आहे. मुलगी झाल्याने तिला बेवारस सोडून जन्मदात्यांनीच पळ काढल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. आजही स्त्रियांबाबत कटुता बाळगणारी मानसिकता कायम असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. त्यामुळे कठोर करवाईची मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT