प्रातिनिधिक छायाचित्र  File Photo
यवतमाळ

Yavatmal News | निंभा येथील तरुणाचा अरुणावती प्रकल्पाच्या बॅक वॉटरमध्ये बुडून मृत्यू

Arunavati Dam | दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाच्या बॅक वॉटरमध्ये घटना

पुढारी वृत्तसेवा

Nimbha Youth Death in Arunavati project back waters

यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाच्या जुना धानोरा बु. बॅक वॉटर जवळ गेलेल्या तालुक्यातील निंभा येथील एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी ही घटना घडली. संतोष लिंबाजी फुफाटे (वय ३५) असे मृताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष जुना धानोरा बु. धरणाच्या बॅक वॉटर कडे गेला होता. यावेळी त्याचा पाय घसरून पाण्यात पडला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनात रामराव मूजमुले, गणेश राठोड करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT