Yavatmal News File Photo
यवतमाळ

Yavatmal News | सिकलसेल रुग्णांची उपचारविना  हेळसांड; जिल्हा प्रशासानाकडे तक्रार

जिल्ह्यात १४ हजार सिकलसेल, थैलेसिमियाचे रुग्ण, त्‍यांच्यावर दररोज उपचारांसाठी ओपीडी आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यात १४ हजार सिकलसेल, थैलेसिमियाचे रुग्ण आहेत. यांच्या उपचारासाठी दररोज ओपीडी असणे आवश्यक आहे. मात्र, आठवड्यात केवळ एक दिवस निश्चित झाल्याने सिकलसेल रुग्णांची हेळसांड होत आहे. याविरोधात आवाज उठवित युवा जागर ट्रस्टच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासानाकडे तक्रार नोंदविण्यात आली.

सिकलसेल, यॅलेसिमियाच्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सिकलसेल आणि थॅलेलेसिमिया रुग्णांसाठी यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात सेवा दिल्या जात नसल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. या विभागासाठी स्वतंत्र डॉक्टर हवे.  वेळेवर औषधी मिळत नाही. यामुळे रुग्णांचे हाल होतात.

सिकलसेल रुग्णांसाठी स्वातंत्र वॉर्ड नाही, अनेकांना जुने रिपोर्ट असताना नवे रिपोर्ट मागितले जातात. ही प्रक्रिया अधिक किचकट आहे. यातून सिकलसेल रुग्णांची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. महाविद्यालयाकडे वैद्यकीय यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्यानंतरही त्याची दखल घेतली गेली नाही. या प्रक्रियेत सुधारणा करून सिकलसेलग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याची मागणी रुग्णांनी केली आहे

यावेळी निवेदन सादर करतांना अलफेज शाह रजिक शाह, सुमित भवरे, उज्ज्वल कपनर, सारिका वेट्टे, वीणा कुडमेथे, प्रियंका भवरे, प्रीती वाघमारे, करण गेडाम आदींसह अनेकजन उपस्थित होते.

रुग्णांनाच डोनर आणण्याचा सल्लाया रुग्णांना वारंवार रक्ताची आवश्यकता असते. मात्र, त्यांना हवे असलेले रक्त उपलब्ध होत नाही. त्यासाठी त्यांनाच डोनर घेऊन या असा सल्ला दिला जातो. यामुळे अनेक रुग्णांना उपचार करताना अडचणींचा सामना करावा लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT