यवतमाळ

Yavatmal News : यवतमाळ हादरले! चार बड्या ज्वेलर्सवर 'सावकारी पथका'चे छापे; अवैध व्यवसायाचा पर्दाफाश

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : शहरातील पलक ज्वेलर्स, विनायक ज्वेलर्स, राठी ज्वेलर्स, वेदधारिणी ज्वेलर्स, यवतमाळ यांच्या दुकानात झडती कार्यवाही करण्यात आली. यामध्ये आक्षेपार्ह दस्तऐवज, सौदेपत्र, खरेदीखत व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आलेली आहे. तालुकास्तरीय प्रशासकीय समन्वय समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांचे समितीच्या आदेशानुसार सावकारी पथकाने आज बुधवारी केली.

पलक ज्वेलर्स, विनायक ज्वेलर्स, राठी ज्वेलर्स, वेदधारिणी ज्वेलर्स, यवतमाळ यांचे विरुध्द शुभांगी राहुल गुल्हाने यांनी ११ मे रोजी अवैध सावकारी करीत असल्याबाबत तक्रार केली होती. त्या अनुषंगाने पडताळणी करण्यासाठी सावकारी पथकाने आज बुधवारी चारही ज्वेलर्सची झडती घेतली. त्यापैकी दोन परवानाधारक सावकार आहे व इतर दोन विनापरवानाधारक सावकार आहे. या कारवाई दरम्यान गैरअर्जदार यांचे दुकानातून काही प्रमाणात दस्तऐवज, सौदेपत्र, खरेदीखत व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे. या कागदपत्राची पडताळणी करुन महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.

या कारवाईसाठी सावकारांचे सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक रिता बाळकृष्ण निनावे यांच्या नियोजनानुसार चार सावकारी पथक नेमण्यात आले.

त्यामध्ये घाटंजी सहकारी संस्थेचे अधिकारी कैलाश खटारे, दारव्हा सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक व्ही. के. हिरूळकर, यवतमाळ येथील सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक रिता निनावे, आर्णीचे सहाय्यक निबंधक प्रकाश झळके यांच्यासोबत कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी तसेच पोलिस प्रशासनातील कर्मचारी, व्हिडिओ फोटोग्राफर आदींचा समावेश होता. संपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विकास मीना, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, पोलिस निरीक्षक सुनील नाईक तथा तालुकास्तरीय प्रशासकीय समिती यांच्या मार्गदर्शनात सहकार विभाग, महसुल विभाग आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT