यवतमाळ

यवतमाळ : मुकुटबन पोलिस ठाण्याच्या हद्दीत २० लाखांचे कीटकनाशक जप्त

backup backup
यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : मुकुटबन पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अडेगाव येथे जिल्हा गुणनियंत्रण पथक व पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून २० लाख ९४ हजार ५६९ रुपयांची कीटकनाशके जप्त केली. या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली आहे.
रमणय्या सुभरायडू राविल्ला असे अवैधरीत्या कीटकनाशकांची साठवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो मुकुटबन पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अडेगाव येथील रहिवासी असून, त्याचे घर शेतात आहे. त्याच्या घरात २७ वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके, तसेच कृषी संजीवके असल्याची गोपनीय माहिती जिल्हा गुणनियंत्रण पथकाला मिळाली होती. जिल्हा गुणनियंत्रण पथकाने याबाबतची खात्री करून पोलिसांच्या मदतीने अडेगाव शेतशिवारातील रमणय्याच्या घरावर छापा टाकला. रमणय्या हा कीटकनाशक नोंदणी
प्रमाणपत्राशिवाय शेतकऱ्यांना कीटकनाशके विकत होता. या पथकाने घराची झडती घेतली असता, तब्बल २० लाख ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घरात आढळून आला. याप्रकरणी झरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी संतोष प्रकाश गिरी यांच्या तक्रारीवरून रमणय्या सुभरायडू राविल्ला याचेविरुद्ध मुकुटबन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कल्याण पाटील, संजय वानखडे यांनी केली. यासाठी मुकुटबनचे पोलिस निरीक्षक सुरेश मस्के, पोलिस कर्मचारी संदीप कुमरे, देवुबाई मेश्राम यांनी सहकार्य केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT