यवतमाळ

Yavatmal News: मोबाईल हरविल्याच्या वादातून सहकाऱ्याचा खून

मोनिका क्षीरसागर

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा; रोजंदार, मजुरीसाठी मध्य प्रदेशातून यवतमाळात आलेल्या दोघांमध्ये अचानक वाद झाला. यातूनच दगडाने मारहाण करून खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे. (Yavatmal News)

रामपालसिंह सिंधनसिंह टेकाम (वय ४५, रा. लामसारी, ता. पुष्पराजगड, जि. अनुपपूर, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे. त्याचा दिनेश विश्वनाथ यादव (वय ३५) याच्याशी सोमवारी रात्री वाद झाला. यातूनच दिनेशने रामपालसिंहची दगडाने मारहाण करून हत्या केली.
मध्य प्रदेशातील मजूर वेनिस पार्क नागपूर बायपास येथे कामाला आहे. जवळपास २० मजूर या ठिकाणी राहत असून, ते एकत्र काम करतात. सोमवारी रात्री दिनेश विश्वनाथ यादव याने त्याचा मोबाइल हरविल्यावरून सर्वांनाच शिवीगाळ सुरू केली. काही काळ त्याचा गोंधळ चालला. नंतर त्याची समजूत काढण्यात आली. त्याचवेळी रामपालसिंह व दिनेशमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. इतरांनी मध्यस्थी केल्याने दोघेही शांत झाले. नंतर दोन तासाने ते दोघे डोर्ली येथे किराणा साहित्य आणण्यासाठी गेले. दिनेश यादव हा तेथून एकटाच परत आला. त्याला विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. संशय बळावल्याने घनश्यामसिंह शिवचरणसिंह याने इतर मजुरांना सोबत घेऊन रामपालसिंहचा शोध घेतला तो डोर्ली जाणाऱ्या मार्गावर झुडपामध्ये रक्तबंबाळ अवस्थेत पडून होता. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. (Yavatmal News)

या घटनेची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शासकीय रुग्णालयात नेला.या प्रकरणी घनश्यामसिंह शिवचरणसिंह टेकाम याच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी दिनेश यादव याच्या याच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी दिनेश यादव याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Yavatmal News)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT