प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
यवतमाळ

यवतमाळ शहरातून नक्षलवादी कमांडरला अटक; नाव बदलून १३ वर्षांपासून वास्तव्य

Yavatmal Naxal Arrest | विविध कारवायाप्रकरणी ६ गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ: पुढारी वृत्तसेवा : छत्तीसगड राज्यातील नक्षल दलम कमांडरच्या मुसक्या आवळण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले आहे. दिलीप उर्फ तुलसी मेहता असे या नक्षलवाद्याचे नाव आहे. 1993 मध्ये झारखंडमधील नक्षली गटात तो भरती झाला होता. तर 1997 मध्ये भीतीया दलम चा विभागीय कमांडर म्हणून त्याची नियुक्ती झाली होती. तर त्याला बारा सशस्त्र नक्षलवाद्यांचे नेतृत्व मिळाले होते. त्याच्यावर सुरक्षा दलावर हल्ले, खंडणी, सरकारी मालमत्तेची तोडफोड, असे अनेक हिंसक कारवायाप्रकरणी 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील तेरा वर्षांपासून नाव बदलून तो यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्यास होता, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे. (Yavatmal Naxal Arrest)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT