Yavtmal Murder | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीस अटक File Photo
यवतमाळ

Yavatmal Murder | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीस अटक

राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना

Namdev Gharal

यवतमाळ : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा खून केला. राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज रविवारी ही घटना उघडकीस आली. वैजंती श्रीनिवास येलके (वय 40) असे मृत पत्नीचे नाव असून श्रीनिवास भीमराव येलके (वय 50) असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

येलके दांपत्य वडकी पोलिस ठाण्याअंतर्गत वडकीवरून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरी इचोड या गावी वास्तव्यास होते. श्रीनिवास व वैजयंती यांच्यामध्ये अनेक वेळा वाद होत होते. पती श्रीनिवास हा वैजयंतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करीत असे. शनिवारी शेतात कामासाठी गेले असता सायंकाळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाले.

श्रीनिवासने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यावर व मानेवर धारदार कुर्‍हाडीने वार करून ठार केले. तिचा मृतदेह तुराट्याखाली लपवून श्रीनिवास पळून गेला. परंतु, हा प्रकार त्याच्या मुलास कळताच त्याने गावकर्‍यांच्या मदतीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीस अटक केली. पुढील तपास उपविभागीय अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुखदेव भोरकडे, पीएसआय देशमुख हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT