Yavatmal Murder | २२ वर्षीय तरुणाचा झोपेत असताना कुर्‍हाडीने वार करुन खून Pudhari
यवतमाळ

Yavatmal Murder | २२ वर्षीय तरुणाचा झोपेत असताना कुर्‍हाडीने वार करुन खून

अनैतिक संबंधाच्या संशयातून घडला प्रकार,

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : अनैतिक संबंधाच्या संशयातून एका २२ वर्षीय तरुणाची झोपेत असताना कुर्‍हाडीने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास वडगाव जंगल पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या बोरीसिंह येथे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

आशिष उर्फ कृष्णा खंडूजी कांबळे (वय २२) रा. बोरीसिंह असे मृतकाचे नाव आहे. तर पांडुरंग प्रल्हाद कांबळे (वय ४०) असे मारेकर्‍याचे नाव आहे. मृतकाचे मागील वर्षभरापासून पांडुरंगच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयाच्या रागातून आरोपीने आशिषचा काटा काढण्याचे ठरविले. मंगळवारी पहाटे आशिष आपल्या घराच्या छतावर झोपेत होता. हीच संधी साधून आरोपी पांडुरंगने हातात कुर्‍हाड घेऊन छतावर प्रवेश केला. त्याने झोपलेल्या आशिषच्या गळ्यावर, पाठीवर आणि हातावर कुर्‍हाडीने वार केले. या हल्ल्यात आशिषचा जागीच मृत्यू झाला.

आशिषची हत्या करण्यापूर्वी आरोपीने संशयावरून आशिषचा मोठा भाऊ शरद खंडूजी कांबळे (वय २९) याच्यावरही कुर्‍हाडीने हल्ला केला होता. सुदैवाने शरद या हल्ल्यातून बचावला. घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील राहुल गुंठे यांनी तातडीने वडगाव जंगल पोलिसांना कळविले. ठाणेदार विकास दांडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर वडगाव जंगल पोलिसांनी आरोपी पांडुरंग कांबळे याला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT