Murder Case pudhari photo
यवतमाळ

Yavatmal Crime : मानलेल्या बहिणीशी बोलल्याचा राग; मित्रानेच केली मित्राची निर्घृण हत्या

पिंपळगाव परिसरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : मानलेल्या बहिणीशी बोलत असल्याच्या कारणावरून मित्रानेच तरूणाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शहरालगतच्या पिंपळगाव परिसरात शनिवारी (दि.५) पहाटेच्या सुमारास घडली. रोहित वीरेंद्र मेश्राम (वय १८) असे मृत तरुणाचे नाव असून, लोहारा पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करत दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले आहे.

रोहितची एका मुलीशी मैत्री होती आणि तो तिच्याशी नेहमी मोबाईलवर बोलत असे. मात्र, एका आरोपी अल्पवयीन मुलाने त्या मुलीला आपली 'मानलेली बहीण' मानले होते. रोहित तिच्याशी सतत बोलत असल्याचा राग आरोपीच्या मनात होता. यावरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच वादातून शुक्रवारी मध्यरात्री आरोपींनी रोहितला फोन करून घराबाहेर बोलावले. घरापासून थोड्या अंतरावर नेऊन त्यांच्यात पुन्हा कडाक्याचे भांडण झाले आणि संतापलेल्या आरोपींनी जवळील धारदार चाकूने रोहितच्या पोटावर वार केले. या प्राणघातक हल्ल्यात रोहितचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रोहित चौधरी यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला असून, आकाश विजय ओंकार यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंदवून दोन्ही अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT