यवतमाळ

Yavatmal Leopard News : शिकारीच्या शोधत बिबट्या पडला विहिरीत, लाखखिंड येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : शिकारीच्या शोधात फिरत असलेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना दारव्हा तालुक्यातील लाखखिंड शेतशिवारात मंगळवारी (दि.१०) घडली. वन्यजीव बचाव पथक व वनविभागाच्या पथकाने माहिती मिळताच या बिबट्याला पिंजर्‍यात बंद करून सुरक्षित ‘रेस्क्यू’ केले.

शेतकरी रमेश जाधव यांच्या शेतात बिबट असल्याची माहिती सकाळी साडेनऊ वाजता मिळाली. त्यानुसार वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बिबट्याला पाहण्याससाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

पोलिसांच्या सहकार्याने गर्दी हटवून बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. हे बिबट नर जातीचे असून त्याचे वय अंदाजे १२ ते १४ महिने आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. हे बचावकार्य उपवनसंरक्षक धनंजय वायभासे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय वन अधिकार नारा बाबू भूवनेश्वर (भा.व.से.) यांच्या उपस्थितीत वन्यजीव बचाव पथक व दारव्हा वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी यशस्विरीत्या पार पाडले. यासाठी ठाणेदार शिवशंकर मुळे यांचे पथक व गावकर्‍यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT