Death News  file pudhari photo
यवतमाळ

Yavatmal Snakebite Death | घरात झोपलेल्या ११ वर्षीय मुलाच्या कानाला सर्पदंश; उपचारादरम्यान मृत्यू

घाटंजी तालुक्यातील माणूसधरी येथील दुर्दैवी घटनेने हळहळ

पुढारी वृत्तसेवा

Ghatanji Child Snakebite Death

यवतमाळ : घरात झोपलेल्या ११ वर्षीय मुलाच्या कानाला सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घाटंजी तालुक्यातील माणूसधरी येथे सोमवारी (दि. २४ ) पहाटे ही दुर्दैवी घटना घडली. आर्यन चंद्रकांत तुम्मावार असे मृत मुलाचे नाव आहे.

आर्यन घरात झोपलेला असताना त्याच्या कानाला सापाने दंश केला. सुरुवातीला एखादा किडा चावल्याचे कुटुंबीयांना वाटल्याने सर्पदंश झाल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. मात्र, काही वेळाने आर्यनची प्रकृती खालावत असल्याचे दिसून आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर आर्यनला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. आर्यनला दंश करणारा साप मण्यार जातीचा असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आर्यन हा माणूसधरी येथील जिल्हा परिषद शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने शाळेतील शिक्षक आणि वर्गमित्रांना मोठा धक्का बसला आहे. अल्पवयीन मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने माणूसधरी गावात हळहळ व्यक्त होत असून, तुम्मावार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT