कुर्‍हाडीने वार करून खून  File Photo
यवतमाळ

Yavatmal Crime : दारूसाठी पैसे न दिल्याने निर्दयी पित्याने कुऱ्हाडीने केला दिव्यांग मुलाचा खून

बाभूळगाव तालुक्यातील सरूळ येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : दारूसाठी पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या पित्याने कुर्‍हाडीने वार करून दिव्यांग मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही ह्दयद्रावक घटना बुधवारी (दि.२६) बाभूळगाव तालुक्यातील सरूळ येथे घडली. अरविंद भिमराव मेश्राम (वय ३२) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी निर्दयी पिता पिता भिमराव मारोती मेश्राम (वय ७१) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरूध्द बाभूळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बाभूळगाव तालुक्यातील दिव्यांग असलेला अरविंद मेश्राम याला स्थानिक प्रशासनाच्या पुढाकाराने घरकुल मिळाले होते. सोबतच दिव्यांग निराधार योजनेचे पैसे मिळाले. अरविंद दिव्यांग असल्याने बाजीवरच पडून राहायचा. योजनेचे पैसे आल्यानंतर नराधम पित्याने त्याला दारूसाठी पैसे मागितले. पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात त्याने अरविंदवर कुर्‍हाडीने वार केले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. अरविंदच्या आईसमोरच ही घटना घडली. घटनेनंतर आई प्रेमिला मेश्राम (वय ६५) यांनी घटनेची तक्रार बाभूळगाव पोलिसात दिली. घटनेचे माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दीपमाला भेंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहीत बेंबरे व उपपोलिस निरीक्षक दीपक आस्कर यांनी घटनास्थळी धाव घेत पित्याला अटक करून त्याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT