Drowning  Pudhari
यवतमाळ

Yavatmal drowning death : पोहण्यासाठी गेलेल्या  बाप-लेकाचा विहिरीत बुडून मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : पोहण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. घाटंजी तालुक्यातील रामनगर तांडा (घोटी) येथे गुरुवारी दि. 28 मे रोजी दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत सचिन प्रेमसिंग जाधव (वय 37) व त्यांचा मोठा मुलगा विहान सचिन जाधव (वय नऊ) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मृतकाचा चुलत भाऊ सुभाष जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारवा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

गुरुवारी दुपारच्या सुमारास सचिन जाधव हे त्यांचा मोठा मुलगा विहान याला सोबत घेऊन गावालगत असलेल्या शोभा आडे यांच्या शेतातील विहिरीवर पोहण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत सात वर्षांचा धाकटा मुलगा सार्थक आणि अन्य एक मुलगा होता. विहिरीवर पोहोचल्यानंतर वडील सचिन आणि मुलगा विहान दोघेही विहिरीच्या पाण्यात उतरले. काही वेळ ते पोहत होते. मात्र, अचानक दोघेही पाण्याखाली गेले आणि वर आले नाहीत अशी माहिती आहे.

घटनेवेळी विहिरीच्या काठावर उभ्या असलेल्या सार्थकने ही बाब पाहिली. त्याने घाबरून घरी धाव घेत कुटुंबीयांना याबाबत सांगितले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. गावकर्‍यांनी आणि पोलिसांनी दोघांनाही विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. शुक्रवारी (ता. 29) रोजी मृतकांचे शवविच्छेदन करण्यात आले. बापलेकाच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पारवा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू  केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT