यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : पुसद तालुक्यातील पांढुर्णा केदारलिंग येथे सोमवारी दर्शनासाठी आलेल्या युवकाला पैनगंगा नदीपात्रात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. यातच त्याचा घात झाला. तो नदीच्या प्रवाहात बुडाला. सलग दोन दिवस शोध घेतल्यानंतर मंगळवारी त्याचा मृतदेह बासंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडला.
सुनील भिवाजी आठवले (३५, रा. कानेरखेड, ता. जि. हिंगोली) असे नदीपात्रात बुडालेल्या युवकाचे नाव आहे. तो सोमवारी कुटुंबासह केदारलिंग येथे महादेवाच्या दर्शनासाठी आला होता. सायंकाळी तो नदीपात्रात पोहण्यासाठी उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बाहेर निघू शकला नाही. गावकऱ्यांनी याची माहिती खंडाळा पोलिसांना दिली. ठाणेदार नीलेश चावडीकर पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
सोमवारी सायंकाळी दोन तास सुनीलचा शोध घेतला. मात्र, तो हाती लागला नाही. मंगळवारी सकाळी पुन्हा तहसीलदार तहसीलदार नायब पोलिस उपनिरीक्षक शिवाजी पवार, सुभाष हगवणे, मधुकर पवार, गोपाल मोरे, सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनात शोधकार्य सुरू करण्यात आले. दुपारी तीन वाजता बासंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुनील आठवले याचा मृतदेह सापडला. सुनीलच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई, भाऊ, बहीण असा आप्तपरिवार आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.