Nanded Triple Murder Pudhari
यवतमाळ

Yavatmal crime | मजुरी करणाऱ्या तरुणाचा खून

या प्रकरणात यवतमाळ शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : शहरात रोजमजुरीसाठी आलेल्या युवकाचा अज्ञातानी चाकूने भोकसून खून केला. ही घटना दोन दिवसांपूर्वीच असून शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. नागपूर - धामणगाव बायपासवर एका निर्जनस्थळी हा मृतदेह पडून होता. पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेजवरून मृतकाची काही तासातच ओळख पटवली. तो लाडखेड येथील असून रोजमजुरी करून यवतमाळातील पोस्टल मैदान परिसरात फुटपाथवर राहत असल्याचे पुढे आले आहे. 

संतोष लक्ष्मण टेकाम (३०) रा. लाडखेड असे मृताचे नाव आहे. संतोष हा यवतमाळातील पूनम चौक परिसरात उभा राहून मिळेल त्या रोजमजुरीच्या कामाला जात होता. मंगळवारी सुध्दा त्याने काही जणांसोबत मजुरीचे काम केले. त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. त्याच्या अंगावर चाकूने भोसकल्याचे अनेक घाव दिसून आले.

पोलिसांनी मृतदेह आढळल्यानंतर काही तासातच शहरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून मृताची ओळख निश्चित केली. आता त्याचा खून कोणी व का केला याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात यवतमाळ शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर एलसीबी पथकाने या गुन्ह्याच्या संदर्भाने चार संशयिताना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT