Crime News  Pudhari
यवतमाळ

Yavatmal crime news | सहा किलो गांजासह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

सुनील दादाराव आगोसे याच्याविरुद्ध पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : दुचाकीवर एका पोत्यात गांजा घेऊन जाणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गांजासह एक लाख ६५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री दरम्यान महागाव तालुक्यातील साई ईजारा ते काळी दौ. मार्गावर केली.

सुनील दादाराव आगोसे (वय ३२, रा. भिलवाडी ता. दिग्रस, मूळ रा. हिवळणी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एकजण दुचाकीने (क्रमांक एमएच २९-एन २८७७) गांजा वाहतूक करीत असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळ रचून दुचाकीला अडविले.

वाहनाच्या तपासणीत सहा किलो २७२ ग्रॅम गांजा मिळून आला. दुचाकी व गांजा, असा एकूण एक लाख ६५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुनील दादाराव आगोसे याच्याविरुद्ध पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश चावरे यांच्या मार्गदर्शनात केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT