Yavatmal Crime | यवतमाळमध्ये अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा; २० सिलिंडर जप्त  
यवतमाळ

Yavatmal Crime | यवतमाळमध्ये अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा; २० सिलिंडर जप्त

तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने मारला छापा

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ :अवैध गॅस रिफिलिंग करणार्‍या एका गॅस शेगडी रिपेअरिंग दुकानावर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने छापा मारला. घरगुती आणि व्यावसायिक वापराचे एकूण २० सिलिंडर जप्त करण्यात आले असून, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी शहरातील वाघापूर रोडस्थित वैशाली नगर परिसरात करण्यात आली. कैलास हरिसिंग चव्हाण (वय ५०, रा. वैभव नगर), असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाघापूर रोडवरील ’चव्हाण गॅस शेगडी रिपेअरिंग’ दुकानात अवैधरीत्या गॅस रिफिलिंग सुरू होती. या माहितीच्या आधारावर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने शनिवारी अचानक छापा टाकला. तिथे मोठ्या प्रमाणात सिलिंडरचा साठा मिळून आला.

दरम्यान, पोलिसांनी पंचासमक्ष १५ किलोचे १५  सिलिंडर किमत अंदाजे १८ हजार रुपये, इतर पाच घरगुती सिलिंडर किमत अंदाजे दहा हजार रुपये, असा एकूण २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सिलिंडर साठ्याबाबत कोणतेही वैध कागदपत्रे सादर न केल्यामुळे पुरवठा विभागाने संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपीला लोहारा पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.

या प्रकरणी निरीक्षण अधिकारी नीलेश कळसकर यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात नीलेश कळसकर, सीमा दोंदल, विष्णू डोळसे आणि नरेंद्र राजपूत यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT