Crime 
यवतमाळ

Yavatmal Crime | फायनान्स कंपनीतील सहकाऱ्यानेच सहकाऱ्याला वाटमारी करुन लुटले; तिघांना अटक

फायनान्स कंपनीमधील प्रकार, सहकाऱ्यानेच सहकाऱ्याला लुटण्याच प्रयत्‍न

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्याने वसुलीसाठी बाहेर जाणाऱ्या सहकाऱ्यावरच पाळत ठेवून लुटमारीची घटना घडवून आणल्याचे घाटंजी पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तीन आरोपींना अटक करून गुन्ह्यातील रक्कम हस्तगत केली.

५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास पवन अंकुश पिंगे (२७, रा. पारोभिता, जि. चंद्रपूर, ह.मु. शिवाजी चौक, घाटंजी) हे सायखेडा येथून घाटंजीकडे दुचाकीने येत होते. त्यांच्यावर दोघांनी दगडाने हल्ला करून त्यांच्याकडील ६६ हजार ३५० रुपयांची रोकड लुटली होती.

घाटंजी ठाणेदार केशव ठाकरे यांनी तातडीने तपासाला गती देत दोन संशयितांना ताब्यात घेतले. यावरून घटनेचा संपूर्ण घटनाक्रम पुढे आला. घाटंजी येथील स्वतंत्र फायनान्समध्ये तक्रारदार पवन पिंगे हा वसूलीचे काम करत होता. त्याच कार्यालयात अरमान अली रोशन अली (१९, रा. मारेगाव, जि. यवतमाळ) हा सुध्दा कार्यरत होता.

त्याने पवनवर पाळत ठेवण्यासाठी पांढरकवडा येथील मित्र मो. जिक्रान मो. रियाज कुरेशी (२५) आणि शेख उबेज शेख रफीक (२८, रा. घाटंजी) यांना सांगितले. त्यानुसार दोघांनी पवनचा पाठलाग करून दगडाने हल्ला करीत रोख रकमेची बॅग हिसकावून पसार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध घेवून अटक केली. त्यांच्या कबुलीवरून अरमानला ताब्यात घेतले. तिघांनाही न्यायलयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT