प्रातिनिधीक छायाचित्र file photo
यवतमाळ

Yavatmal Crime | यवतमाळ : गुप्तधन शोधणार्‍या सात जणांविरुद्ध गुन्हा!

हनुमान मंदिराजवळ पूजा-पाठ करुन खड्डा खोदण्याचा प्रयत्‍न

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : वणी तालुक्यातील मानकी गावालगतच्या हनुमान मंदिर परिसरात गुप्तधन मिळविण्याच्या अंधश्रद्धेतून खड्डा खोदण्याचा प्रकार शुक्रवार दि. 23 ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आला. ग्रामस्थांनी दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, तर अन्य पाच जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या प्रकरणी वणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपींचा शोध सुरू केला.

शुक्रवारी रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास पाच पुरुष आणि दोन महिला हनुमान मंदिराजवळ पूजा-पाठ करीत असल्याचे तसेच टिकास व फावड्याच्या साहाय्याने खड्डा खोदत असल्याचे काही युवकांच्या निदर्शनास आले. गुप्तधनाच्या शोधासाठी हा प्रकार सुरू असल्याचा संशय आल्याने युवकांनी ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. ही वार्ता गावात पसरताच सुमारे 100 ते 150 ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले.

ग्रामस्थांना पाहताच पाच जणांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. मात्र, वणी येथील अनिल मारोती बावणे (वय 56) आणि मानकी येथील रामदास निळकंठ दर्वे (वय 44) यांना ग्रामस्थांनी पकडून ठेवले. घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील आणि तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी वणी पोलिसांना कळविले.सहायक पोलिस निरीक्षक सय्यद साजिद यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून दोघांना ताब्यात घेतले.

घटनास्थळावरून पूजेसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणात फरार असलेल्या वासुदेव नामदेव मडावी, गणेश शत्रुघ्न दुबे, विठ्ठल नारायण अतकरे, रंजना संतोष कामटकर आणि वेणू प्रशांत पोळोजवार यांच्यासह एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT