Yavatmal Crime : अत्याचार करून धमकी देणार्‍या आरोपीस 20 वर्षांचा कारावास! pudhari photo
यवतमाळ

Yavtmal Crime : अत्याचार करून धमकी देणार्‍या आरोपीस 20 वर्षांचा कारावास!

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मारून टाकण्याची धमकी देणार्‍या आरोपीला 20 वर्ष सश्रम करावासाची शिक्षा सुनावली. सोमवारी विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. यू. बघेल यांनी हा निकाल दिला.

सुभाष उर्फ गोलू विठ्ठल पवार (वय 35, रा. घाटंजी), असे आरोपीचे नाव आहे. घाटंजी तालुक्यातील दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी 5 मार्च 2024 ला सकाळी शाळेत जात होती. सकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपी सुभाष उर्फ गोलू पवार याने शाळेच्या रस्त्यावर तिला अडवून शौचालयाच्या मागे नेले व तिच्यावर अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास आई व कुटुंबीयांना मारून टाकण्याची धमकी दिली.

पीडित मुलीने सायंकाळी घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने घाटंजी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून गुन्हा नोंद करीत आरोपीला अटक करण्यात आली. तपास अधिकार्‍यांनी गुन्ह्याचा तपास करून वैद्यकीय अहवाल, प्रत्यक्ष पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबासह प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले.

तक्रारकर्ती महिला, पीडित मुलगी, तपासी अधिकारी, पंच व वैद्यकीय अधिकारी, तसेच इतर परिस्थितीजन्य पुरावे आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानून आरोपीला दोषी धरून शिक्षा ठोठावली. यात 20 वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, दुसर्‍या एक कलमान्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि पाचशे रुपये दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम पीडितेस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही जारी केले आहे. या प्रकरणात सरकारी वकील अ‍ॅड. संदीप दर्डा यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सारिका बोधनकर यांनी सहकार्य केले. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT