Theft Burglary Pudhari
यवतमाळ

Yavatmal Crime : यवतमाळ हादरले! महागावमध्ये मध्यरात्री घरफोडी; २४ लाखांचा मुद्देमाल लंपास, परिसरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील उटी येथे शनिवारी मध्यरात्री एका धाडसी घरफोडीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून तब्बल २४ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यामध्ये सुमारे साडेसात तोळे सोन्याचे दागिने, चांदी आणि दीड लाख रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, उटी येथील रहिवासी राजू नानाराव गावंडे यांच्या घरात ही चोरी झाली. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घरात प्रवेश केला. घरातील आलमारीचे लॉकर अत्यंत चलाखीने तोडून त्यातील मौल्यवान दागिने आणि रोकड लंपास केली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी घरातील इतर कोणत्याही साहित्याला हात लावला नाही. केवळ किमती वस्तूंनाच लक्ष्य केल्याने, चोरट्यांनी घराची रेकी केली असावी किंवा त्यांना घरातील व्यवहारांची पूर्वकल्पना असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलीस यंत्रणा सतर्क, शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने ॲक्शन मोडमध्ये आले. आयपीएस हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (पुसद) आणि महागाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी ठसे तज्ज्ञ, श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळावरून काही महत्त्वपूर्ण ठसे हाती लागले असले तरी, श्वानपथकाला ठोस धागादोरे मिळण्यात यश आले नाही.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

महागाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या मोठ्या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरत आहे. याप्रकरणी अनिकेत गावंडे यांच्या फिर्यादीवरून महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक आणि पथक अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT