यवतमाळ

यवतमाळ : लाच मागणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याची कारागृहात रवानगी

करण शिंदे

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : निलंबित केलेल्या ग्रामसेवकाला सेवेत पूर्ववत करण्यासाठी सकारात्मक अहवाल देण्याकरिता ५० हजार रुपयाच्या लाचेची मागणी विस्तार अधिकाऱ्याकडून करण्यात आली होती. या प्रकरणात जिल्हा परिषद पंचायत विभागातील विस्तार अधिकाऱ्याला लाच लुचपत पथकाने मंगळवारी अटक केली. या प्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी नाकारत त्याला काही दिवस कारागृहात रवानगी केली.

विस्तार अधिकारी रामदास चंदनकर असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्याविरोधात पैशांची मागणी केल्याची तक्रार आर्णी पंचायत समितीतील ग्रामसेवकाने लाच लुचपत पथकाकडे दिली. लाच लुचपत पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर एसीबी पथकाने जिल्हा परिषदेत सापळा रचला होता. मात्र, चंदनकर यांनी लाच घेतली नाही. त्यामुळे लाचेची मागणी केली. या आरोपाखाली त्यांना ताब्यात घेऊन एसीबीने गुन्हा दाखल केला. त्यानंतर बुधवारी आरोपीला न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT