यवतमाळ

Yavatmal Bribe Case : दारव्हा पंचायत समितीच्या कनिष्ठ सहाय्यकाला ७४ हजारांची लाच घेताना अटक

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : वाढीव पेन्शन खात्यात जमा केल्याची दाखवून ७५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या दारव्हा पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकाला सोमवारी (दि. १६) लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अफरोज खान कलीम खान पठाण (वय ४४) असे लाचखोर कर्मचार्‍याचे नाव आहे. संशयीत आरोपी विरोधात दारव्हा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तक्रारदार आजीला वयाच्या ८० वर्षानंतर वाढीव पेन्शन मंजुर झाली. त्यानुसार १ लाख ७३ हजार ८७६ रुपये पेन्शन खात्यावर जमा केले. प्रत्यक्षात ९५ हजार रुपये पेन्शन मंजूर झाली असून, बँक खात्यात जास्तीची रक्कम जमा झाल्याचे संशयीत आरोपीने सांगितले. वाढीव रक्कम मंजूर करून दिल्याबाबतच आरोपी अफरोज खान कलीम खान पठाण यांनी ७५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यावरून यवतमाळ लाचलुचपत विभागाकडे तक्रारदाराने तक्रार केली होती. या तक्रारीवरून शहानिशा करण्यात आली. तसेच तडजोडीअंती ७४ हजार रुपयांची लाच मागितल्याचे पंचासमोर निष्पन्न झाले. दरम्यान, लाचेची रक्कम सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास संशयीत आरोपीने स्वीकारताच आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

सायंकाळच्या सुमारास आरोपीच्या घराचीसुद्धा झडती घेण्यात आली. या प्रकरणात आरोपी अफरोज खान कलीम खान पठाण याच्याविरोधात दारव्हा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अभय आष्टेकर, पोलिस निरीक्षक अर्जुन घनवट, मनोज ओरके, सुधीर कांबळे, अतुल मत्ते, रोहिणी पाटील, सचिन भोयर, भागवत पाटील, आकाश सहारे, सूरज मेश्राम, सतीश सोनोने, मनीषा राजूरकर, चालक दिनेश सरोदे, अतुल नागमोते आदींनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT