यवतमाळ : Yavatmal Accident | यवतमाळ जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरू असतानाच आज पुन्हा दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने जबर धडक दिली. यामध्ये दोघेजण गंभीर तर एक जण जागीच ठार झाला आहे. अपघाताची ही घटना बाबुळगाव तालुक्यातील नांदुरा गावाजवळ घडली.
ट्रॅक्टर हा मजूर घेऊन जाण्यासाठी उभा होता. दरम्यान, वाहतूक करणारा आयशर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टरचा समोरील भाग चक्काचूर झाला. तेथील नागरिकांनी ट्रक चालकाला चोप दिल्याने चालक गंभीर आहे. तर ट्रॅक्टरमधील एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.