Woman Assault Pudhari
यवतमाळ

Yavatmal Crime : तरुणीचे ‘एआय’ तंत्रज्ञानाने आक्षेपार्ह फोटो बनवून व्हायरल करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एका महाविद्यालयीन तरुणीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी चार नामांकित सोशल मीडिया अकाऊंट्स आणि फेक आयडी धारकांसह एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रथमेश सर्वे, तसेच ‘रेड झोन ४७’, ‘गौरी ५९१’, ‘मिस डेव्हिल’ आणि एका फेक इंस्टाग्राम आयडीचा वापर करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांत तक्रार दाखल

हा संपूर्ण प्रकार २३ ते २८ जून या कालावधीत घडला. आपले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने तात्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने संबंधित इंस्टाग्राम आयडी धारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT