मॉर्निंग वॉकला गेलेल्या कृषी अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू  File Photo
यवतमाळ

यवतमाळ : मॉर्निंग वॉकला गेलेल्या कृषी अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

अयोध्या नगर परिसरात हळहळ

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : मॉर्निंग वॉक गेलेले पंकज रामदासजी बरडे (वय ५०) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तत्काळ क्रिटीकेअर रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. नव्या वर्षात पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

अयोध्या नगरात राहत असलेले पंकज बरडे हे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात कृषी अधिकारी पदावर कार्यरत होते. दररोज पहाटे मॉर्निंग वॉकला जाण्याची त्यांना सवय होती. बुधवारी पहाटे नियमित सवयीप्रमाणे ते सकाळी मॉर्निंग वॉकला गेले. आर्णी मार्गावरील जांब बायपासवर मॉर्निंग वॉक करीत त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते रत्यावर कोसळले. काही अंतरावर असलेल्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT