Wani Yavatmal road Truck bike collision
यवतमाळ : ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार झाले. ही घटना मारेगाव तालुक्यातील वणी-यवतमाळ मार्गावरील तुळशीराम बारसमोर शनिवारी (दि.१६) रात्री घडली. गौरव बापूराव आत्राम (वय २३, रा. गौराळा), नोमेश्वरी राजेंद्र हनुमंते (वय १७) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, हे दोघेही वणी येथून एमएच २९ बीडब्ल्यू ७५७५ क्रमांकाच्या दुचाकीवरून मारेगावकडे येत होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रक आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिकेने दोघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. ट्रक चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला. पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहेत.