Tiger vs leopard, प्रातिनिधीक छायाचित्र 
यवतमाळ

Tiger vs leopard fight | शिकारीवरून वाघीण - बिबट्या भिडलेः संघर्षात बिबट्याचा मृत्यू

यवतमाळ येथील पांढरकवडा येथील टिपेश्वर अभयारण्यातील घटना

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : वाघीण आणि बिबट्याच्या संघर्षात अंदाजे चार वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाला. पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात आज शनिवारी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे अभयारण्यात वन्यजीवांमधील शिकारीवरून होणारा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.

वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, टी-44 क्रमांक असलेली आणि पर्यटकात प्रसिद्ध असलेले नाव ‘डेझी’ या  नावाच्या वाघिणीने हरणाची शिकार केली होती. या शिकारीवर बिबट्याने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाघीण आणि बिबट्या आमनेसामने आले आणि दोघांमध्ये जोरदार संघर्ष झाला. या संघर्षात वाघिणीने बिबट्यावर हल्ला करून त्याला ठार केले. संघर्षानंतर वाघिणीने बिबट्याचा मृतदेह तलावाजवळील डोंगराच्या उतरत्या भागातील बांबूच्या झुडपाखाली नेऊन ठेवला होता.

नियमित गस्तीदरम्यान वनमजुरांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी वरिष्ठांना माहिती देताच पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ दुर्गम असल्याने तेथेच शवविच्छेदन व दहनविधी करणे शक्य नव्हते. त्यामुळे मृतदेह सुरक्षितरीत्या बाहेर आणण्यात आला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. बिबट्याचा अंगावर अनेक ठिकाणी नखांचे आणि दातांचे खोलवर जखमा होत्या. बिबट्याचे आवश्यक नमुने व काही महत्त्वाचे अवयव जतन करून ठेवण्यात आले.

पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बिबट्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. रणजित नाळे यांच्या नेतृत्वात डॉ. पायघन आणि डॉ. काळमेघ यांनी शवविच्छेदन प्रक्रिया पार पाडली. ही संपूर्ण प्रक्रिया टिपेश्वर अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक उदय आव्हाड, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत सोनुले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित नाळे तसेच मानद वन्यजीव रक्षक रमजान विराणी आणि निसर्ग मित्र मंचचे अध्यक्ष सुबोध काळपांडे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी वनपाल शशांक  सोनटक्के, चंद्रकांत  हेमके, वनरक्षक दिगंबर पोटे, स्मिता बेलेकर आणि वन मजूर उपस्थित होते. या घटनेमुळे टीपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांच्या अधिवासातील स्पर्धा आणि अन्नसाखळीतील संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT