यवतमाळ : आधी हा सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा पण आता आत्महत्येचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथली माणसे मला नवीन नाहीत, अजूनही प्रश्न तेच आहेत, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. राळेगाव येथे अशोक मेश्राम यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘1989 मध्ये राजकारण मध्ये आलो. अनेक वर्षे विदर्भात फिरतोय.इतकी वर्ष काम करताना 1993 साली नागपूरला बेरोजगार तरुणांसाठी मोर्चा काढला. त्यावेळी तो काळ धगधगता होता. त्यानंतर बाबरी मशीद पडली, दंगली झाल्या. त्यावेळी माझा सर्वाधिक वेळ विदर्भ आणि मराठवाड्यात गेला. मी सर्वाधिक काळ हा विदर्भ आणि मराठवाड्यात घालवला आहे. त्यामुळे मला येथील प्रश्न माहिती आहेत. इथली माणसे मला नवीन नाहीत. आज 2024 लाही त्यांचे प्रश्न तेच आहेत.’(Maharashtra assembly poll)
यावेळी राज ठाकरे यांनी राज्य सरकार व शरद पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले. लाडक्या बहिणीला 1500 रूपये त्यांनी दिले, पण आम्ही त्यांना रोजगार निर्मीती करून देवू. शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीच विष पेरलं, असा घणाघातही राज ठाकरे यांनी यावेळी केला.