Tempel Tuttle comet meteor shower  
यवतमाळ

Tempel Tuttle comet meteor shower : 17 नोव्हेंबरची रात्र लक्षात ठेवा! टेम्पलटटल धुमकेतूमुळे होणारा उल्कावर्षाव अनुभवता येणार

१७ व १८ नोव्हेंबरला ५५ पी/ टेंपल टटल हा धूमकेतू पृथ्वीच्या कक्षेतून जाणार

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : येत्या १७ व १८ नोव्हेंबरला ५५ पी/ टेंपल टटल हा धूमकेतू पृथ्वीच्या कक्षेतून जाणार आहे. हा धूमकेतू ज्या कक्षेतून जाणार आहे त्या ठिकाणी उल्का वर्षाव अनुभवता येणार आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत उल्कावर्षाव दृष्टीस पडणार आहे. सिंह तारकासमूहातून उल्का वर्षाव होणार आहे. यावेळी ताशी १० ते १२ उल्का पडताना दिसणार आहे.

१७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर पहाटे ५.३० वा. पर्यंत हा नजारा आपल्याला पाहता येईल. मध्यरात्रीनंतर चंद्राचा अस्त होईल. त्यामुळे उल्का स्पष्टपणे दिसतील. या उल्का वर्षावासाठी कारणीभूत असणारा ५५ पी/ टेम्पलटटल हा धूमकेतू दर ३३ वर्षांनी सूर्याभोवती एक परिक्रमा करतो. याची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या पातळीतूनच जाते. त्यामुळे धूमकेतूने मागे सोडलेला मलबा येथे जमा होतो. हा कचरा पृथ्वीकडे खेचला जातो. यामुळे पृथ्वीच्या कक्षेतील उल्का जवळून पाहता येणार आहे.

टेम्पल टटल हा धूमकेतू १९९९ साली पृथ्वीजवळून गेला होता, तेव्हा खूप मोठ्या संख्येने उल्का पहावयास मिळाल्या. पण इतक्या वर्षात धूमकेतूचा हा मलबा आता कमी झाल्यामुळे उल्का दिसण्याचे प्रमाणं कमी झाले आहे. हा उल्का वर्षाव पाहण्यासाठी मध्यरात्रीनंतर पूर्वेकडे गावाच्या बाहेर (कमीत कमी ५ कि.मी. दूर) अंधाऱ्या जागी जावे लागेल. शहरातून, घराच्या गच्चीवरून हा उल्का वर्षाव दिसणार नाही.

जिज्ञासू व संयमी व्यक्तींनी हा नजारा अवश्य पहावा, असे आवाहन स्काय वाँच ग्रुप, यवतमाळचे अध्यक्ष रवींद्र खराबे, प्रमोद जिरापुरे, उमेश शेंबाडे, भूषण ब्राह्मणे, जयंत कर्णिक, पंकज गोपतवार, पूजा रेकलवार, मानसी फेंडर व शुभांगी झिलपे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT