यवतमाळ

Accident News : भरधाव ट्रकच्या धडकेत दोन जवानांचा मृत्यू

करण शिंदे

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : धामणगाव मधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघाताची घटना गुरूवारी (दि.6) घडली. लोकसभा निवडणूकीचा बंदोबस्त आवरुन बीडमधून गडचिरोली येथे जाणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या वाहनाला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली. या धडकेत ही घटना एका जवानाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

गिरीष कुमार (वय. 42 रा. केरळ) आणि तेजश्वर राव (वय. 36 रा. आंध्रप्रदेश) अशी मृत जवानांची नावे आहेत. तर अब्दुल रफिक असे जखमी जवानाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, लोकसभा निवडणूक मतमोजणी बंदोबस्तासाठी सीआरपीएफचे जवान बिड येथे आले होते. बंदोबस्त आटोपल्यानंतर जवानांचे वाहन बीड येथून गडचिरोलीकडे निघाले होते. दरम्यान धामणगावजवळील समृध्दी महामार्गावर भरधाव ट्रकने सीआरपीएफ जवानांच्या वाहनाला मागच्या दिशेने येवून धडक दिली.

या धडकेत तेजश्वर राव या जवानाचा जागीच मृत्यू झाला. तर गिरीष कुमार आणि अब्दुल रफिक गंभीर जखमी झाले होते. दरम्यान रूग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सायंकाळी गंभीर जखमींमधील गिरीष कुमार या जवानाचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अब्दुल रफिक यांच्यावर उपचार सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी रूग्णालयात भेट देवून जखमी जवानांची चौकशी केली. शवविच्छेदनानंतर मृत जवानांचे शव नागपूर विमानतळावरून त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी दिली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT