Earthquake नागरिकांमध्ये भीती File Photo
यवतमाळ

Yavatmal Earthquake | यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के: पुसद, वसंतनगर परिसरातील नागरिक भयभीत

हिंगोली जिल्ह्यात रिश्टर स्केलवर 4.7 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : हिंगोली जिल्ह्यात रिश्टर स्केलवर 4.7 तीव्रतेचा भूकंप नोंदविण्यात आला. या भूकंपाचे सौम्य धक्के यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, वसंतनगर तसेच आसपासच्या परिसरात जाणवले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे यवतमाळ जिल्ह्यात कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही. संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल प्रशासन व स्थानिक यंत्रणा सतर्क असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सज्ज आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. भूकंपाचे धक्के जाणवल्यास सुरक्षित ठिकाणी जावे, इमारतीबाहेर मोकळ्या जागेत उभे राहावे व आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाव्दारे सूचित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT