Life imprisonment for husband who killed pregnant wife
गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप Pudhari File Photo
यवतमाळ

यवतमाळ : गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या आरोपी पतीस यवतमाळ न्यायालयाने शुक्रवारी (दि.12) रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरिफखाँ आझादखाँ (वय.३७ रा. दिग्रस) असे आरोपीचे नाव आहे. 23 ऑगस्ट 2014 दिवशी रोजी दारव्हा येथे ही घटना घडली होती.

साजेदाबी हिचे लग्न आरिफखाँ आझादखाँ सोबत झाले होते. परंतु, आरिफखाँ आणि त्याचे नातेवाईक मानसिक व शारीरिक त्रास देत असल्यामुळे साजेदाबी वडिलांकडे राहत होती. घटनेच्या दिवशी साजेदाबी व तिचे आई- वडील, बहीण घरी हजर असताना तिचा पती दारव्हा येथे आला. त्याने तू माझ्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार का केली व कोर्टात केस का दाखल केली या कारणावरून साजेदाबी सोबत वाद घातला.

या दरम्यान हा वाद इतका टोकाला गेला की, त्याने खिशातील चाकू काढून गर्भवती असलेल्या साजेदाबी हिच्या छातीवर वार केले. यातच साजेदाबी हिच मृत्यू झाला. याप्रकरणी साजेदाबीचे वडील मेहदाबखाँ चॉदखॉ यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे यांनी तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात शासनातर्फे ११ जणांची साक्ष नोंदविली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन येथील जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजितकुमार बी. भस्मे यांनी आरोपीला आजन्म कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी वकील अंकुश एस. देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी सुरेश सगणे, जमादार गजानन भगत यांनी सहाय्य केले.

SCROLL FOR NEXT