पालकमंत्री संजय राठोड यांच्या कारचा अपघात  file photo
यवतमाळ

यवतमाळ : पालकमंत्री संजय राठोड यांच्या कारचा अपघात

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : यवतमाळ- वाशिम येथील दिग्रस कोपराजवळ पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा शुक्रवारी (दि.4) मध्यरात्री अपघात झाला. या अपघातात पालकमंत्री संजय राठोड यांचा चालक जखमी झाला आहे. गाडीच्या एयर बॅग वेळेवर उघडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात मंत्री राठोड यांच्या वाहनाचं मोठं नुकसान झालं. तर पिकअप वाहनाचा चालकही गंभीर जखमी झाला आहे.

वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी येथे ५ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकार्पण सोहळ्यानिमित्त येत आहेत. याच कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथे गेले होते. दरम्यान रात्री दोन सव्वा दोन वाजता ते परत येत असताना पिक अप वाहन आणि त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात संजय राठोड यांचा चालक जखमी झाला आहे. दिग्रस जवळील कोपरा येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनानं पीकअप वाहनाला जोरदार धडक दिली. मंत्री संजय राठोड यांच्या वाहनानं पिक अपला मागून दिलेली धडक इतकी जोरदार होती की पीक अप वाहन पलटी होऊन त्याचा चालक गंभीर जखमी झाला. तर संजय राठोड यांच्या वाहनाचा समोरील भाग चकनाचूर झाला. वाहनातील एअर बॅग उघडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमी चालकावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT