यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
नेर तालुक्यातील खरडगाव येथे सोमवारी (दि.30) सकाळी ९ वाजता शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला कारजा लाड येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. निलेश अंबादास ठवळी (वय.४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
निलेश हा सोमवारी त्याच्या शेतामधील सोयाबीन पाहणीसाठी गेला होता. यावेळी मधमाशांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता. त्याचा तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.