यवतमाळ : दुगदिवी उत्सवातील महाप्रसाद घेण्यासाठी जाणाऱ्या मुलाचा मार्गातील खोल नाल्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. हृदय पिळवून टाकणारी ही घटना शनिवार दि. ४ ऑक्टोबर रोजी पुसद तालुक्यातील बांशी येथे दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
सत्यशील गणेश केवटे (वय १०) असे मृत मुलाचे नाव आहे. सत्यशील हा आपल्या घराच्या बाजूलाच असलेल्या दुर्गादेवी मंडपाजवळ महाप्रसाद असल्यामुळे त्या ठिकाणी जेवण करायला जात होता. रस्त्यात नाला असल्यामुळे ते ओलांडूनच जावे लागत होते. दि. ३ ऑक्टोंबर रोजी दुपारी दिड वाजताच्या सुमारास सत्यशील हा नाला ओलांडत असताना तोल सुटल्याने तो पडला.
नाला खोल असल्यामुळे अंदाज लागला नाही. यामध्येच त्याचा बुडून मृत्यू झाला. सत्यशील हा तीन वर्षाचा असताना त्याची आई त्यास सोडून गेली. वडील मनोरूग्ण असल्यामुळे सत्यशील हा गावातील वसतीगृहात राहत होता. या घटनेमुळे बांशी परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.