दारव्हा तालुक्यातील चिखली येथील एका कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना बनावट खताची विक्री करण्यात येत होती. याबाबतच्या तक्रारीनंतर पोलिसांनी धाड टाकून खतांचा साठा पकडला. याप्रकरणी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिखली येथील दिलीप देशकरी यांच्या रामनाथ अॅग्रो सेंटर येथे बनावट खत विक्री होत असल्याची फिर्याद उपविभागीय कृषी अधिकारी विजय सरोदे यांनी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून सदर कृषी केंद्रात धाड टाकण्यात आली. त्यावेळी बनावट खतांच्या ३४० बॅग खत आढळून आल्या. त्यामधील ६० बॅगची शेतकऱ्यांना विकी केल्याचे सांगण्यात आले. ३४० बॅगची किंमत ४ लाख ९१ हजार ८०० रूपये आहे. याप्रकरणी अभिजीत नरवडे (मे. राधा फटीकेम लि.पुणे), शुभम बानखेले (रा. पुणे), सचिन रामसिंगाणी (रा. पुणे), विकास नलावडे (रा. पुणे), दिलीप देशकरी (रा.चिखली) यांच्या विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.