Robbery Pudhari
यवतमाळ

Yavatmal Jewellery Theft : ‘ज्वेलर्स’ फोडून १८ लाखांची धाडसी चोरी

बाभूळगाव शहरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : ‘ज्वेलर्स’ चे दुकान फोडून चोरट्यांनी १७ लाख ७० हजार किंमतीचा ३५४ ग्रॅम सोन्याचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी (दि.२७) बाभूळगाव शहरातील मुख्य बाजारात उघडकीस आली. याप्रकरणी जितेंद्र प्रेमचंद तातेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाभूळगाव पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र तातेड हे यवतमाळ येथील रहिवासी असून त्यांचे बाभूळगाव येथील मुख्य बाजारपेठेत ’धनश्री ज्वेलर्स’ नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. शनिवारी रात्री तातेड नेहमीप्रमाणे दुकान बंद करून यवतमाळला निघून गेले होते. रविवारी दुकानाला सुट्टी असल्याने दुकान बंदच होते. सोमवारी सकाळी शेजारील दुकानदारांना धनश्री ज्वेलर्सचे कुलूप व कोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तातडीने ही माहिती तातेड यांना दिली. त्यानंतर त्यांनी बाभूळगाव येथे धाव घेतली. दरम्यान दुकानात प्रवेश करून पाहणी केली असता चोरट्यांनी आतील कपाटे फोडून तब्बल ३५४ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी बाभूळगाव पोलिसांना याची माहिती दिली.

त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ज्ञांसह पोलिस घटनास्थळी आले. पोलिस श्वानाने घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या एका अंगणवाडीजवळील झोपडीत पडलेल्या लोखंडी रॉडपर्यंत माग काढला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. घटनेनंतर जितेंद्र तातेड यांच्या तक्रारीवरून बाभूळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT