File Photo
यवतमाळ

वीज चोरी करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई

संबंधित साहित्य जप्त

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : बाभूळगाव शहरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावर वीज चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. वीज वितरण कंपनीच्या पथकाने धाड टाकून संबंधितांवर कारवाई केली. ही कारवाई सोमवारी (दि.२०) करण्यात आली.

शहरात पाणीपुरवठा योजनेची पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्ते खोदून नाली बनविली जात आहे. या कामावर विद्युत यंत्रे वापरली जात आहे. कंत्राटदाराने वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा न घेता थेट आकडे टाकून विजेची चोरी चालविली होती. याबाबतची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धडक दिली. वीज चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर कामावरील साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकारामुळे संबंधित ठेकेदार, काम करणाऱ्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पाणीपुरवठा योजना तब्बल २५ कोटी रुपयांची आहे. मात्र या योजनेचे काम करताना कुठलेही नियोजन करण्यात आले नाही. पाईपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदून अक्षरशः रस्त्यांची चाळणी केली जात आहे. रस्ते फोडण्यासाठी जेसीबी यंत्रांसह ड्रील मशीनचा वापर सुरू आहे. शासकीय कामावरच आकडे टाकून वीज चोरी होत असल्याने काय कारवाई केली जाते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. वीज चोरी प्रकरणी कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करून पोलिस स्टेशनला तक्रार केली जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT