भरधाव ऑटो उलटल्याने १३ वर्षीय विद्यार्थी ठार झाला.  
यवतमाळ

यवतमाळ : भरधाव ऑटो उलटल्याने १३ वर्षीय विद्यार्थी ठार

Yavatmal Accident : पुसद येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात विद्यार्थी घेऊन जाणारा भरधाव आटो उलटला. या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला. ही दुदैवी घटना मंगळवारी (दि.११) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पुसद शहरातील साई मंदिर परिसरात घडली. या घटनेने पालकांत संतापाची लाट पसरली आहे. उमरखेड तालुक्यातही १५ दिवसांपूर्वी २५ जानेवारीला स्कुल बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात महिमा नामक विद्यार्थीनीचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांनाच ऑटो अपघातात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

सौरव भिका राठोड ( वय १३) रा. दहिवड ब्रु. ता. पुसद असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पुसद येथील आसेगावकर शाळेत सातव्या वर्गात शिक्षण घेत होता. दहिवड येथे स्कूलबस जात नसल्याने त्या गावातील विद्यार्थी ऑटोने पुसद येथे शाळेत येतात. नेहमीप्रमाणे आज सकाळी सौरव व अन्य विद्यार्थी ऑटोने शाळेत जात होते. अशातच पुसद येथील साईमंदिर परिसरात एम. एच. २९ व्हि. ८९७६ क्रमांकाचा ऑटोचा अपघात झाला. यात सौरव राठोड हा विद्यार्थी ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. उमरखेड व पुसद येथे झालेल्या अपघाताच्या घटनांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT