विदर्भ

यवतमाळ : पाच हजाराची लाच घेताना पुरवठा निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

backup backup
यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुरवठा निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. आज गुरुवारी (दि. २) दुपारी साडेपाच वाजता दरम्यान आर्णी येथील तहसील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
स्नेहल राजेंद्र देशमुख (वय ३६) असे या पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे. तळणी येथील रास्तभाव दुकानदाराला अंत्योदयमधील कमिशनचे बिल काढण्यासाठी पाच हजाराची लाच मागितल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून गुरुवारी साडेपाच वाजताच्या दरम्यान यशस्वी सापळा रचून पुरवठा निरक्षकाला त्याच्या कक्षात रंगेहाथ पाच हजाराची लाच घेताना पकडण्यात आले. त्यात प्रदीप भगत खासगी इसम व दुसरा दर्शन अनिल जगताप यांच्या माध्यमातून तडजोडीअंती पाच हजार रुपयासह पुरवठा निरीक्षक यांना ताब्यात घेण्यात आले.
या घटनेनंतर आरोपींना तहसील कार्यालयातून विश्रामगृहात स्थानबद्ध करून चौकशी सुरू करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक मारोती जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक शैलेश सपकाळ, जगदाळे, निलेश पखाले, महेश वाकोडे, राकेश सावसाकळे, अब्दुल वसीम, सचिन भोयर, सुधाकर कोकेवार यांनी केली.
SCROLL FOR NEXT